मसुरे | झुंजार पेडणेकर : असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या मालवण तालुक्यातील बिळवस गावच्या जलमंदिर श्री सातेरी देवी जत्रोत्सवा निमित्त शनिवारी भाजप नेते निलेश राणे यांनी सातेरी मातेचे आशिर्वाद घेतले. मातेचे दर्शन घेतल्या नंतर देवस्थान ट्रस्टच्या वतीने स्वागत कक्ष येथे भाजप नेते निलेश राणे यांचा देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष भाई सावंत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, बिळवस सरपंच सौ मानसी पालव, महान सरपंच अक्षय तावडे, माजी जी प अध्यक्ष सौ सरोज परब, मसूरे माजी सरपंच सौ लक्ष्मी पेडणेकर, ग्राम. सदस्य संतोष पालव, पंकज सादये, शिवाजी परब तसेच ट्रस्ट पदाधिकारी ग्रामस्थ, भाजप कार्यकर्ते, सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, संतोष गावकर, नांदोस उपरपंच विजय निकम, ललित चव्हाण उपस्थित होते.












