माखजन |वार्ताहर : राज्य पतसंस्था प्रतिवर्षी पतसंस्थांचे आर्थिक व्यवहारांची माहिती घेत त्या आधारावर उत्तम काम करणाऱ्या पतसंस्थाना सन्मानित करते. राज्य पतसंस्था फेडरेशन ने पुरस्कार द्यायला सुरवात केल्यापासुन आजपर्यंत शिववैभव पतसंस्थेने पुरस्कारसाठी भाग घेतला आहे.यावर्षी प्रथमच संस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
राज्य पतसंस्था फेडरेशन चे अध्यक्ष पतसंस्था चळवळीचे नेतृत्व काकासाहेब कोयटे यांनी तज्ञ समितीने निवड केलेल्या पुरस्कार प्राप्त संस्थांची नावे जाहीर केली. ५० ते १०० कोटी ठेव प्रकारात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या कोकण विभागातून शिववैभव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित कुचांबे पतसंस्थेला दीपस्तंभ पुरस्कार प्राप्त झाला आहे.
शिववैभव पतसंस्था सातत्याने उत्तम आर्थिक व्यवहार करत आली आहे. पतसंस्था सह्याद्रीच्या पायथ्याशी असून ग्रामीण भागातील गोरगरीब सर्वसामान्य सभासदांशी व्यवहार करत आहे आणि आता संस्था शहरी भागात पदार्पण करत आहे. पतसंस्थेची विक्रमी वसुली हा संस्थेच्या यशाचा आत्मा राहिला आहे. भांडवल पर्याप्तता १४. ४४%इतकी प्रभावी राहिली आहे . ६ कोटींचा स्वनिधी हा संस्थेची उत्तम आर्थिक स्थितीचा द्योतक मानला जातो. १३१५४ सभासद संख्या संस्थेला सर्वसमावेशक संस्थेचा दर्जा देते. ६९.७५ कोटींच्या ठेवी ५२. ८७ कोटींची कर्ज २२. ९२ कोटींच्या गुंतवणुका अश्या भक्कम स्थितीत शिववैभव पतसंस्था सातत्याने राहिली आहे. संस्थेने स्पर्धात्मक युगात उपक्रमशीलता जोपासात प्राप्त प्रत्येक संधीचा लाभ उठवण्यात संस्थेने कोणतीही कसर सोडली नाही नवतंत्रज्ञानाचा उत्तम उपयोग करत ग्राहकाना सर्वोत्तम सेवा देऊ करण्याचा परिपाठ जपला आहे. या पार्श्वभूमीवर प्राप्त झालेला हा पुरस्कार उर्जादायी ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.प्रकाश थेराडे चार्टर्ड अकाऊंटंट आणि संस्थेचे सेक्रेटरी श्री. संतोष थेराडे यांनी दिली.











