दापोली l प्रतिनिधी: दापोली तालुक्यातील वेळवी गावात एम.एस.सी.बी ह्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी श्री. सुनिता विलास दळवी यांच्या 8 महिन्याच्या गाबण म्हशीला शॉक लागून मृत्यू झाला आहे. नेहमीप्रमाणे विलास दळवी हे शेतकरी आपल्या 3 ते 4 म्हैशी घेऊन होते. वेळवी येथील मराठवाड्यामधील आत्माराम खेडेकर यांच्या घराशेजारी म्हैशी चरवत असताना पोलवरील तार तुटून खाली माळ रानातील गवतामध्ये पडलेली होती. म्हैस चरवत असताना विलास दळवी यांना ती तार दिसली नाही. दुर्दैवाने म्हैशीला तारेचा स्पर्श झाला. तारेचा होताच म्हैस जमिनीवर कोसळली. शेतकरी विलास दळवी यांना नंतर लक्षात आले की शॉक लागला आहे. त्यांना सुद्धा विजेचा झटका बसला परंतु ते त्यातून बचावले. त्यांनी इतर म्हैशीना बाजूला करुन घटनेची माहिती गावच्या पोलीस पाटील रेवा झगडे, तलाठी, कोतवाल रविंद्र राजे यांना दिली. यानंतर गावचे ग्रामस्थ रविंद्र दळवी, आत्माराम खेडेकर, कमलेश दळवी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. लोंढे, आणि महावितरण अधिकारी, कर्मचारी यांनी उपस्थित राहुन घटनेचा पंचनामा करण्याचे काम चालु होते.












