पावस बाजारपेठेतील शेडमध्ये भाजून जखमी झालेल्या प्रौढाचा मृत्यू

संग्रहित छाया

 

रत्नागिरी | प्रतिनिधी : तालुक्यातील पावस बाजारपेठेतील शेडमध्ये भाजून जखमी झालेल्या प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवार 29 जुलै रोजी रात्री 10.30 वा.घडली.

 

विश्वनाथ तुकाराम भोसले (50,रा.पावस बाजारपेठ,रत्नागिरी) असे भाजून मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. विश्वनाथ भोसले हे पावस बाजारपेठेतील शेडमध्ये एकटेच रहात होते. सोमवारी सायंकाळी ते भाजल्यामुळे त्यांना 108 रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.