कंजूमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर असोसिएशन अध्यक्षपदी भूषण वाडेकर यांची निवड

 

संस्थेच्या कार्यकारी मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत १७ सदस्यांची बिनविरोध निवड झाली.

कणकवली – प्रतिनिधी :- कंजूमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युटर्स असोसिएशन सिंधुदुर्ग या नोंदणीकृत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा 26 जुलै रोजी कणकवलीत जिल्हाध्यक्ष अरविंद नेवाळकर यांच्या उपस्थितीत पार पडली. कार्यवाहक विवेक नेवाळकर यांनी सभेचे कामकाज पार पाडले.

 

 

 

यावेळी 2024 ते 20 27 या तीन वर्षाकरिता कार्यकारी मंडळ निवडणूक कार्यक्रम घटनेनुसार घेण्यात आला. जिल्हाभरातून 17 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते सर्व 17 सभासद अर्ज वैध ठरल्यानंतर या सर्वांची बिनविरोध निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री.अमित पंडित यांनी कामकाज पाहिले. या निवडणुकीत वेंगुर्ला दोन सावंतवाडी तीन कणकवली चार आणि मालवण तालुक्यातील तीन अशा एकूण पाच विभागातून १७ सदस्य निवडले गेले.

 

 

 

यावेळी नूतन अध्यक्ष म्हणून भूषण वाडेकर कणकवली , उपाध्यक्ष- दत्ताराम मळगावकर सावंतवाडी जिल्हा कार्यवाह – विवेक नेवाळकर कट्टा मालवण) , कोषाध्यक्ष – मनोहर जोईल देवगड, सहसचिव वामन म्हापणकर कुडाळ सल्लागार अरविंद नेवाळकर-मालवण कट्टा कुडाळ तालुका संपर्कप्रमुख राजेंद्र माणगावकर ,सावंतवाडी विभाग संपर्कप्रमुख नरसिंह गवस, मालवण तालुका संपर्कप्रमुख -गणेश खोत, वेंगुरला तालुका संपर्कप्रमुख मिलिंद शिवलकर कार्यकारी मंडळ सदस्य याप्रमाणे हितेश मंगे आणि मंदार मराठे -कणकवली निलेश तवटे -कसाल महेश तोरस्कर आणि रोहन गोडे -कुडाळ शैलेश टिळवे -सावंतवाडी
संजय कळंगुटकर -वेंगुर्ले सर्व सदस्य यांचा निवडणूक निर्णय अधिकारी अमित पंडित यांच्या उपस्थितीत पदग्रहण व शपथविधी सोहळा पार पडला .विवेक नेवाळकर यांना जिल्हा कार्यवाह पदाचा बहुमान सतत १४ वर्षे मिळाला मिळाला . संस्था स्थापनेपासून अरविंद नेवाळकर यांनी केलेल्या बहुमूल्य कार्याचा गौरव करण्यात आला वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर ठराव संमत करण्यात आले.