माजगाव येथील जय शंभो मंडळाचे अध्यक्ष राकेश सावंत यांचे निधन

सावंतवाडी । प्रतिनिधी : माजगाव येथील जय शंभो मंडळाचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते राकेश कृष्णा सावंत (४५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मंगळवारी सकाळपासून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.

उपचारानंतर त्यांना घरी आणण्यात आले मात्र रात्री त्याना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचे पहाटेच्या सुमारास निधन झाले. अतिशय मनमिळावू हसतमुख व मैत्री जपणारा सामाजिक कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या अकाली निधनाने माजगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, वहिनी, पत्नी, लहान मुले असा परिवार आहे.

फोटो : राकेश सावंत