गुहागर (प्रतिनिधी): वैयक्तिकरित्या लागवड करण्यापेक्षा बचत गटाच्या माध्यमातून नाचणी सारख्या पिकाची लागवड करून पडिक जमीन लागवडीखाली आणावी ,असे आवाहन करत कोतळूक च्या उज्वल उत्पादक गटाने केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन गुहागरचे गट विकास अधिकारी प्रमोद केळस्कर यानी केले.
पंचायत समिती गुहागरच्या नाचणी लागवडीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत कोतळूक येथील उज्वल उत्पादक गटाच्या सामुहिक नाचणी लागवड कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सरपंच प्रगती मोहिते, माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मणजी शिगवण, कृषी अधिकारी राजकुमार धायगुडे,कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर,प्रतिक जाधव,ग्रामविकास अधिकारी मोहन घरत, सी.आर.पी नम्रता भेकरे , प्रयोगशील शेतकरी जानू कावणकर,धनंजय शिगवण,अंकिता गुरव इ. मान्यवर उपस्थित होते.
कोतळूक येथील उज्वल उत्पादक गट व इतर बचत गट मिळून एकूण दोन एकर क्षेत्रावर सामुहिक नाचणी लागवड करण्यात आली आहे.
कोतळूक गावाला आदर्श गावाचा नावलौकिक आहे. येथील शेतकरी कष्टाळू आहेत. याबद्दल येथील शेतक-यांचं कौतुकही यावेळी गट विकास अधिकारी श्री. केळस्कर यांनी केले.
माजी पंचायत समिती सदस्य लक्ष्मणसेठ शिगवण यांनी कोतळूक येथील बचत गटाने एकत्र येत नाचणी लागवड केल्याबद्दल कौतुक करून या बचत गटांना नेहमीच आमचं सहकार्य राहील,असेही त्यांनी सांगितले.
पंचायत समितीकडून येथील बचत गटांना नेहमीच तांत्रिक सहकार्य केल्या जाईल,असेही कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी सांगीतले.
यावेळी उज्वल उत्पादक गटाच्या अध्यक्षा विनया गांधी,सचिव संध्या पडवळकर,स्नेहा शिगवण,
प्राची शिगवण,संजना कावणकर,
प्रांजल शिगवण,नम्रता शिगवण,
रसिका शिगवण,सुहासिनी शिगवण
अंकीता शिगवण,रंजना शिगवण
साक्षी कावणकर,अर्पिता शिगवण,
कांचना शिगवण ,सानिका शिगवण
निर्मला शिगवण , मोहिनी शिगवण,
शितल शिगवण,सुलभा गांधी,
उज्वला शिगवण,
ग्राम सेवा संघाच्या अध्यक्ष श्रद्धा बागकर, सीटीसी अश्विनी नाटुस्कर,अंकिता गुरव, सोनाली मोहिते,संगिता पवार, बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. ग्राम विकास अधिकारी मोहन घरत यांनी आभार मानले.












