तळवली आगरवाडी अंगणवाडी इमारतीचे सुरेश सावंत यांच्याहस्ते भूमिपूजन

अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या इमारतीच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला

गुहागर | प्रतिनिधी : तालुक्यातील तळवली आगरवाडी अंगणवाडी शाळेच्या नूतन इमारतीचा भूमिपूजन सोहळा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच पार पडले.
महिला बाल विकास मंत्री .आदिती तटकरे व रायगड रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या निधीतून तळवली आगरवाडी अंगणवाडी काम मंजूर झाले आहे. मागील अनेक वर्षे ही इमारत अक्षरशः मोडकळीस आली होती. विविधस्तरावर या इमारतीच्या बांधकामासाठी प्रयत्न केले जात होते.मात्र या कामासाठी मंजुरी मिळत नव्हती.अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश सावंत यांनी या इमारतीच्या बांधकामासाठी निधी मंजूर करून आणण्यात यश मिळवले.यामुळे विद्यार्थी व पालक तसेच ग्रामस्थांचा अनेक वर्षांपासूनचा असलेला प्रश्न सुटणार आहे.

 

 

या भूमिपूजन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र युवक प्रदेश सरचिटणीस साहिल आरेकर, गावचे विद्यमान सरपंच संतोष जोशी ग्रामपंचायत सदस्य सुनील मते, मानसी पोफळे, सामाजिक कार्यकर्ते काशीराम डाकवे, प्रकाश शिगवण, देऊळवाडी अध्यक्ष संदीप महाडिक, माजी सरपंच यशोदा सांगळे, माजी उपसरपंच राकेश पवार,गुरुनाथ कारेकर,ग्राम विकास अधिकारी श्री बागुल,अंगणवाडी सेविका सुनीता सांगळे,मदतनीस सौ.पवार व ग्रामस्थ तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.