तो नाट्यप्रयोग ठरला अखेरचा

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

ज्येष्ठ दशावतार कलाकार आपा कामतेकर यांची अकाली एक्झिट

सावंतवाडी | प्रतिनिधी

रंगभूमीची सेवा हेच आपले व्रत मानून आपले आयुष्य वेचणारे अनेक व्रतस्थ कलाकार व्रत जोपासतात. असेच दशावतार कला हेच आपले व्रत मानून काम करणारे अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळाचे जेष्ठ कलाकार शिवराम दत्ताराम उर्फ आपा कामतेकर (५०, रा. आजगांव माळयारवाडी ) यांनी रंगभूमीची सेवा करीत असतानाच आपल्या इहलोकीची यात्रा संपवली. परुळे गावूडवाडी येथील नाट्यप्रयोग त्यांचा अखेरचा प्रयोग ठरला.

अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळाचा परुळे गावूडवाडी येथील म्हाळसाई मंदिरात सोमवार रात्री दशावतार नाट्य प्रयोग होता. हा प्रयोग संपल्यानंतर बिऱ्हाडात गेल्यावर त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यांनतर त्यांनी थोडासा आराम करायचे ठरवले पण जास्तच त्रास जाणवू लागल्याने त्यांना सहकाऱ्यांनी कुडाळ येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.

एक उत्कृष्ट खलनायक म्हणून ते दशावतार क्षेत्रात परिचित होते. त्यांनी आजगावकर कलेश्वर नाईक मोचेमाडकर पारसेकर आरोलकर खानोलकर व अमृतनाथ दशावतार मंडळात काम केले होते सध्या ते पेंटिंगचे काम करायचे त्यांच्या पश्चात भाऊ पत्नी वहिनी मुलगी पुतणे असा मोठा परिवार आहे आज दुपारी बारा वाजता आजगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली