राजापूर | प्रतिनिधी –
राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरशा बाबत अनेक वेळा तक्रारी करुनही व प्रांताधिकारी यानी दिलेल्या आदेशान्वये अद्यापही सदर मदरशावर कारवाई करुन तो बंद न केल्याने धोपेश्वर पन्हळे येथील ग्रामस्थानी १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी तहसिलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे . याबबतचे निवेदन धोपेश्वर पन्हळे येथील ग्रामस्थ अमोल सोगम यानी प्रशासनाला दिले आहे .
गेली दोन वर्ष राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथे अनधिकृतपणे सुरु असणारा मदरसा तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी येथील ग्रामस्थानी वेळोवेळी प्रशासनाकडे केलेली असताना अद्यापही हा मदरसा बंद न केल्याने आता येथील ग्रामस्थानी आमरण उपोषणाचा ईशारा दिला आहे .
या अगोदर या मदरशा विरोधात येथील ग्रामस्थानी २६ जानेवारी २०२४ रोजी ग्रामपंचायत धोपेश्वर कार्यालयासमोर उपोषनाचा मार्ग अवलंबला होता मात्र प्रशासनाने याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले होते . त्यानंतर प्रांताधिकारी राजापूर यानी येथील ग्रामस्थांसहीत मदरशाचे पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती . त्यावेळी या बैठकित प्रांताधिकारी राजापूर यानी सदर मदरशा त्वरीत बंद करण्याचे आदेश दिले होते अशी माहिती अमोल सोगम यानी दिली आहे .
मात्र त्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षातही सदर मदरसा राजरोसपणे सुरु आहे . प्रांताधिकारी राजापूर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली असल्याचे सांगत आता १५ ऑगस्ट २०२४ म्हणजेच स्वातंत्र्यदिनापासुन या मदरशाविरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा येथील ग्रामस्थानी दिला आहे .











