खेडच्या मंगेश मोरेंचे स्वातंत्र्यदिनी विविध मागण्यांसाठी उपोषण

खेड(प्रतिनिधी) शहरातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश मोरे व अन्य सहकारी यांनी विविध मागण्यांसाठी १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला असून तसे लेखी निवेदन संबंधित विभागांना दिले आहे.
त्यामध्ये न. प. हद्दीतील दापोली- खेड-भरणे मुख्य मार्गासह परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे बुजवण्याकडे करण्यात आलेले दुर्लक्ष, खेड-भोस्ते- रेल्वेस्थानक मार्ग खड्डेमय बनल्याने वाहनचालकांना होणारा त्रास व विविध खेळांच्या खेळपट्टी उपलब्धततेसाठी जिल्हा क्रीडा खात्याचे लक्ष वेधले जाणार आहे. कळंबणी येथील सीएनजी पंपातून कमी मायलेज मिळत असल्याची समस्या तसेच पंपात स्थानिक रिक्षा चालक-मालकांसाठी स्वतंत्र लाईनची व्यवस्था करण्याच्या मागणीचा समावेश आहे.