महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ शाखा रत्नागिरी जिल्हा उपशाखा लांजाची नुतन कार्यकारिणी जाहीर 

 

 

अध्यक्षपदी श्रध्दा सरपोतदार तर सचिवपदी मिलींद माने यांची निवड 

लांजा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघ शाखा रत्नागिरी जिल्हा, उपशाखा लांजाची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी श्रध्दा सरपोतदार यांनी निवड करण्यात आली आहे.

याबाबत संघटनेची बैठक नुकतीच पार पडली.

रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीखाली झालेल्या या बैठकीत सर्वांच्या मताने नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या नुतन कार्यकारिणी मध्ये अध्यक्षपदी श्रीम. श्रद्धा विनायक सरपोतदार, उपाध्यक्ष म्हणून रुपेश चंद्रकांत पत्याणे तर सचिवपदी मिलिंद भालचंद्र माने यांची निवड करण्यात आली. सहसचिव म्हणून संदीप सखाराम कांबळे, खजिनदार पदी प्रभाकर कृष्णा कानसरे, सहखजिनदारपदी

सौ मयुरी महेश ब्रीद तर सदस्य म्हणून सदानंद तुकाराम किल्लेकर, कु. महेश काशिनाथ वीर, सौ वैदही विनोद गुरव, कु. मिथुन बबन कांबळे, सुनील सदाशिव पडये, सौ विधि विलास वीर, सौ रोशनी पवन आगरे, शरद सुरेश सावंत, भिमराज अरुण धनावडे, प्रदीप लक्ष्मण जोशी, सौ साक्षी संतोष जाधव, अतुल अनंत पळसुलेदेसाई यांची निवड करण्यात आली.

या नूतन कार्यकारणींचा सत्कार जिल्हाध्यक्ष व उपस्थित जिल्हा कार्यकारणी यांच्या हस्ते करण्यात आला.