लांजा (प्रतिनिधी )शहरातील लोकमान्य वाचनालय लांजे या संस्थेच्या वतीने डॉ. एस्.आर.रंगनाथन यांच्या १३२ व्या जयंतीचे औचित्य साधून ग्रंथालय दिन साजरा करण्यात आला
या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकमान्य वाचनालयाचे सल्लागार विजय बेर्डे यांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले.यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष योगेश वाघधरे ,कार्यवाह उमेश केसरकर, संचालक विजय हटकर , विनोद बेनकर आदी उपस्थित होते.
या प्रसंगी सल्लागार विजय बेर्डे यांनी डॉ. एस. आर. रंगनाथ यांच्या ग्रंथालयीन चळवळीतील योगदानाबद्दल वाचकांना माहिती दिली. तसेच वाचनालयाच्या आजपर्यंत प्रगतीचा आढावा घेऊन वाचनाचे महत्त्व पटवून दिले. तसेच वाचनालयाचे संचालक विजय हटकर यांनी डाँ.रंगनाथन यांचे बालपण तसेच त्यांनी ग्रंथालय चळवळ वाढण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या त्यांच्या जीवन चरीत्र विषयी माहिती सांगितली.त्यानंतर वाचनालयाचे कार्यवाह उमेश केसरकर यांनी ग्रंथालय दिनाचे महत्व आणि वाचनसंस्कृतीची माहिती दिली. वाचनालयाचे सभासद सौ.मुग्धा सार्दळ यांनी वाचनालयात वाचनात आलेल्या वेगवेगळ्या वाचनसाहित्या विषयी अनुभव सांगून वाचनालय राबवित असलेल्या वेगवेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमांचे सुत्रसंचालन वाचनालयाचे स.ग्रंथपाल रामचंद्र लांजेकर यांनी केले. कार्यक्रमास वाचनालयाचे कर्मचारी .वाचक,सभासद, मोठ्या संख्येने उपस्थित होते.












