कुडाळ मतदार संघाच्या जनता दरबारात नागरिकांचा असंतोष!७५० तक्रारी, ३५९ तक्रारीचे निवारण!

 

 

  जनतेसाठी वेळ देण्याची अधिकाऱ्यांची ग्वाही 

 पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या जनता दरबारामुळे सरकारी यंत्रणा हालली

सिंधुनगरी : बाळ खडपकर :सिंधुनगरीतील जनता दरबाराच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कुडाळ मतदार संघातील नागरिकांचा मोठा लोंढा दिसला. या मतदारसंघातील जनतेचा असंतोष जाणवला. या मतदारसंघातील ७५० नागरिकांचे तक्रारीचे अर्ज होते. त्यातील ३५९ तक्रारी पैकी २८६ तक्रारींचे निवारण झाले ७३ तक्रारी शिल्लक राहिल्या. उर्वरित राहिलेल्या तक्रारी नागरिकांना टोकन देण्यात आली असून उद्या सुनावणी होऊन सोडविल्या जातील अशी माहिती देण्यात आली. तर पुढच्या काळात अशा तक्रारी येऊ नये व उपोषण करण्याची वेळ येऊ नये म्हणून जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. असे आदेश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेत. अधिकाऱ्यांनी त्याला प्रतिसाद देत जनतेसाठी वेळ देऊ व जनतेच्या तक्रारीचे निवारण करू अशी ग्वाही दिल्याचे पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

कुडाळ विधानसभा मतदारसंघातील कुडाळ आणि मालवण तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन सिंधुनगरी येथील जिल्हा नियोजन सभा गृहात झालेल्या जनता दरबारामध्ये मोठी गर्दी केली होती. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख, भाजप नेते निलेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह विविध अधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

सरकारी यंत्रणा धास्तावली

 

पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतील या जनता दरबारामुळे प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यंत्रणेवर फार मोठा प्रभाव पडला असून अनेक महिने नागरिकांची रेंगाळलेली कामे मार्गी लावण्यासाठी सरकारी यंत्रणांनी पुढाकार घेतला आहे. या जनता दरबारात येण्यापूर्वीच जनतेची रेंगाळलेली कामे विविध विभागाणी सोडविली आहेत. तरीही कुडाळ मालवण मधील नागरिकांनी केलेली गर्दी व रेंगाळलेल्या कामांमुळे नागरिकांमधील असंतोष जाणवला. आपले सरकार भाजप सह युतीचे नेते सर्वसामान्य जनतेचे आहे. जनतेचे प्रश्न सुटावेत व त्यांच्यासाठी सरकारने काम करावे ही आम्हा सर्वांची भूमिका असल्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले.

 

जनता दरबार गरजेचा

भाजप नेते निलेश राणे

 

भाजप नेते निलेश राणे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत या नेत्यानी ही पालकमंत्र्यांसमवेत उपस्थिती राहत या मतदारसंघातील जनतेचे अनेक प्रश्न समजावून घेतले. काही प्रश्न छोटे छोटे असले तरी प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही होत नव्हती. काही प्रश्न लागलीच सुटले गेले. आगामी काळात जनतेच्या प्रश्नांच्या सोडवण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कल्पकतेतील या जनता दरबाराची गरज आहे असेही भाजप नेते निलेश राणे आपल्या प्रतिक्रियेत म्हणाले.

 

गेळे विषय सुटल्याचे मुख्यमंत्री उद्या जाहीर करणार

 

सावंतवाडी तालुक्यातील गेळे येथील नागरिकांच्या प्रश्न आपण यापूर्वी सोडवीला आहे. या प्रश्नासाठी मुख्यमंत्र्यांनी एक बैठक मुंबई येथे बोलावली आहे. जिल्हाधिकारी यांनाही या बैठकीचे निमंत्रण आहे. त्यामुळे ते त्या बैठकीला जातील. बुधवारी सावंतवाडी मतदार संघतील जनतेसाठी जनता दरबार आहे. नागरिकांनी आपले प्रश्न घेऊन या जनता दरबारात यावे असे आवाहन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.

अशा आल्या तक्रारी

जनतादरबार मध्ये दाखल करून घेण्यात आलेल्या तक्रारी मध्ये महसूल विभागाच्या सर्वाधिक 98 तक्रारी प्राप्त 82 निकाली 16 शिल्लक, भूमिअभिलेख 1 तक्रार तिहि निकाली काढली,नगरविकास 14 तक्रारी 9 निकाली 5 शिल्लक , विज महावितरण 18

तक्रारी 11 निकाली 7 शिल्लक , एसटी 10

तक्रारी 8 निकाली 2 शिल्लक, बीएसएनल 10 तक्रारी 8 निकाली 2 शिल्लक ,सार्वजनिक बांधकाम 33 तक्रारी 24 निकाली 9 शिल्लक,पाटबंधारे 1 तक्रार तीही निकाली ,राष्ट्रीय महामार्ग 14 तक्रारी 12 निकाली 2 शिल्लक,जलसंधारण 6 तक्रारी 5 निकाली 1 शिल्लक,पोलीस 1तक्रार तीही शिल्लक,राज्य उत्पादन शुल्क 1 तक्रार तीही निकाली , आरटीओ 1तक्रार तीही निकाली,ग्रामविकास 82 तक्रारी 71 निकाली 17 शिल्लक ,वनविभाग 8 तक्रारी 5 निकाली 3 शिल्लक,कृषी 7 तक्रारी 6 निकाली 1 शिल्लक , आरोग्य 10 तक्रारी 8 निकाली 2 शिल्लक,मत्स्य 2 तक्रारी दोन्ही निकाली, पत्तन 2 तक्रारी 1 निकाली 1 शिल्लक , बंदर 5 तक्रारी 4 निकाली 1 शिल्लक , अन्न व औषध प्रशासन 3 तक्रारी 2 निकाली 1 शिल्लक,समाज कल्याण 2 तक्रारी दोन्ही निकाली,कामगार आयुक्त 1 तक्रार तीही निकाली,महिला व बाल विकास विभाग 1 तक्रार तीही निकाली ,सहकारी सस्था उपनिबधक 1तक्रार तीही निकाली नगररचना 2 तक्रारी दोन्ही निकाली , एमटी डीसी 2 तक्रारी दोन्ही निकाली , जिल्हा प्रकल्प अधिकारी ( ITDP) 2 तक्रारी दोन्ही शिल्लक , रेल्वे प्रशासन 3 तक्रारी 2 निकाली 1 शिल्लक ,इतर संकीर्ण 18 तक्रारी 13 निकाली 5 शिल्लक असे आकडेवारी ही पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केली