रत्नागिरी । प्रतिनिधी :तालुक्यातील गोळप येथे उंदीर मारण्याचे औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री 1.40 वा. घडली.
सुरेश प्रकाश डोंगरे (33, रा. गोळप डोंगरेवाडी,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. सोमवार 12 ऑगस्ट रोजी सकाळी सुरेशने अज्ञात कारणातून राहत्या घरी उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले होते. त्यानंतर त्याला उलट्या होउन छातीत जळजळ होउ लागल्याने त्याचा चुलत भाउ सुनिल गोपाळ डोंगरे याने त्याला उपचारांसाठी सकाळी 10 वा. जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी उपचार सुरु असताना मध्यरात्री 1.40 वा. सुरेशचा मृत्यू झाला.











