रत्नागिरीतील एकाची फसवणूक
रत्नागिरी । प्रतिनिधी :क्रेडिट कार्डव्दारे तब्बल दीड लाख रुपयांची रक्कम डेबीट केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूकीची ही घटना 14 जुलै रोजी दुपारी 3.29 वा. बोर्डिंग रोड परिसरात घडली आहे.
याप्रकरणी फिर्यादीने शहर पोलिस ठाण्यात सोमवार 12 ऑगस्ट रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 14 जुलै रोजी ते घरी असताना मोबाईलवर क्रेडिटकार्डवर असेलेल रिवॉर्ड पॉईंट रिडिम करत होते. त्यावेळी टेक्सट मेसेजमधील एका लिंकव क्लिक केले असता अॅक्सिस बँकेच्या इंटरनेट बँकिंग सारखे पेज ओपन झाले. त्यानंतर फिर्यादीने पेजवरील कॉलम प्रमाणे त्यांच्या अॅक्सिस बँकेच्या के्रडिट कार्डची माहिती भरली. काही वेळाने त्यांना ओटीपी आल्यावरतो ऑटोफिलमध्ये सबमिट झाल्यानंतर फिर्यादीच्या अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरुन 1 लाख 50 हजार रुपये डेबिट झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
कोणीतरी अज्ञाताने आपली ऑनलाईन फसवणूक केल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता अधिनियम 2023 चे कलम 318 (4) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम क 66 (क)(ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











