जिल्हा बँक तज्ञ संचालक आम.नितेश राणे.
सिंधुनगरी प्रतिनिधी
भाजप नेतृत्वाखालील सरकार महिलांना विकासाच्या प्रवाहात आणत आहे. महिलांसाठी अनेक योजना सरकारने आणल्या आहेत. आपणही अनेक ठिकाणी फिरत असताना महिलांच्या विकासासाठी या जिल्ह्यात काय करता येईल याचा अभ्यास करत असतो. व तशा योजना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत राबविण्याचा आपला प्रयत्न असतो. जिल्हा बँक या जिल्ह्यात महिलांसाठी राबवित असलेली सखी योजना ही देशातील पहिली योजना असेल! या जिल्ह्यातील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढावे म्हणून भाजप नेते नारायण राणे यांचा सातत्याने प्रयत्न आहे. या जिल्ह्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मोठा वाटा असेल असा प्रयत्न जिल्हा बँकेच्या या योजनांमधून होत आहे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक आम. नितेश राणे यांनी केले.

आ नितेश राणे पुढे म्हणाले की, बँकेच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी आणण्यासाठी महिलांसाठी या योजना जिल्हा बँक हाती घेत आहे. शेतकऱ्यांची ही जिल्हा बँक म्हणून या बँकेने चांगले काम यापूर्वी केले आहे. बँकेच्या या प्रवाहात जिल्ह्यातील महिलांनाही सहभागी करून घेण्याचा आपला प्रयत्न आहे. महिलांसाठी सखी ही योजना आणली गेली आहे. त्याबाबत जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांच्याशी चर्चा केल्यावर ही योजना राबविण्याचे निश्चित करण्यात आले. बँक सखी गावातील प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचून त्यांना बँकेच्या योजनांची माहिती देऊन आर्थिक मदत करण्यासाठी प्रयत्न करतील. दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी बँक सखीच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहे. अजून नवनवीन योजना जिल्हा वासियांसाठी आणणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी जाहीर केले.












