रायपूर (छत्तीसगड), – छत्तीगडचे मुख्यमंत्री श्री विष्णू देव साय यांनी आज जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांची भेट घेतली. छत्तीसगड रायपूर येथे मुख्यमंत्र्यांनी स्वामीजींचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज सध्या छत्तीसगड दौऱ्यावर आहेत. संस्थानचे दुर्ग जिल्ह्यातील पाटण येथे पीठ आहे. त्यामुळे स्वामीजी वेळोवेळी छत्तीसगडला जात असतात. या दौऱ्यात उभयतांमध्ये अध्यात्म, धर्म, सामाजिक प्रश्नावर तासभर चर्चा झाली. मुख्यमंत्री श्री साय यांनी जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक केले.












