इंग्लिश मिडीयम स्कूल,आबलोली येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 

 

आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल,आबलोली येथे चंद्रकला फाऊंडेशनच्या सेक्रेटरी स्नेहल सचिन बाईत यांच्या हस्ते ७८ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व विद्यार्थी, शिक्षक ,पालक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत,राज्यगीत,ध्वजगीत ,समूहगीत गायन करण्यात आले.

यानंतर इ.९वी व १०वी च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्वातंत्र्य दिनाच्या फलकाचे अनावरण स्नेहल बाईत व डॉ.गौरी अतुल गावड यांच्या हस्ते करण्यात आले. इ.१ली ते ४ थी चे विद्यार्थी यावेळी वेगवेगळ्या वेशभूषा करून आले होते.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन चंद्रकांत बाईत, सेक्रेटरी स्नेहल सचिन बाईत यांनी मुलांनी विविध प्रकारच्या शैक्षणिक उपक्रमामध्ये उस्फूर्तपणे सहभाग घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले तसेच सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी मुख्याध्यापिका नेत्रा नरेंद्र रहाटे,साळुंखे एस एस, सौ. मुल्ला एस.आर,शिगवण पी.एस,केंबळे टी.जे,गोणबरे डी.एस.,पवार एस.एस, साळवी प्रसाद प्रदिप पालक आदी उपस्थित होते.