मनसे चषक बुध्दीबळ स्पर्धा सपन्न मुलींमध्ये गार्गी सावंत सर्वोत्तम

 

राजापूर (वार्ताहर): मनसे कार्यकर्ते अमृत तांबडे यांच्या वाढदिवसानिमित्त राजापूर लांजा संगमेश्वर विधानसभा मतदार संघ मर्यादित मनसे चषक बुद्धिबळ स्पर्धा रविवारी पार पडली.

यामध्ये राजेंद्र साळवी, चिराग समीर प्रभुदेसाई, मृणाल विकास कुंभार, सोहम नित्यानंद बावधनकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकावले.

मुलींमध्ये सर्वोत्तम खेळाडूचा मान गार्गी सावंत हिने मिळविला.

१५ वर्षे खालील मुले गटात १. शुभम आनंद बावधनकर २. ऋषील मुळीक

३. देवाशीष नवरे. मुलींमध्ये १. मुग्धा पेणकर हिने प्रथम क्रमांक पटकावला.

१३ वर्षे खालील मुले गटात १. यश प्रकाश कातकर,२. मानवीक सुशांत मराठे ३. केदार कांबळे तर मुली १. उमा अमृत तांबडे, २. समृद्धी वालेकर यांनी सुयश मिळविले.

११ वर्ष खालील मुले १.नील कुडाळी २.मयांक बोटले ३.चिन्मय गणेश बाकाळकर तर मुलींमध्ये १.सानवी संदीप सरखोत, २. ईश्वरी सप्रे. ९ वर्षे खालील मुले १. हेमांग प्रशांत मराठे २. राजस नाईक ७ वर्षे खालील मुली १. रमा तांबडे२. खदिजा सय्यद मुलगे१. निहाल सय्यद २. कपिल तांबडे यांनी सुयश मिळविले. विजेत्या स्पर्धकांना उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले.