26 एप्रिल 2023 राशीभविष्य

26 April 2023 Horoscope (Osho Tarot)

मेष – आज एकांतात राहून स्वतःच्या मनात डोकवा. तुमच्या सर्व प्रश्नांची ऊत्तरे मिळतील.

वृषभ – लग्नासंबधीत बोलणी आज करू नका. गुरूजनांचे सहकार्य, सल्ला मिळेल.

मिथुन – आज जास्त मेहनत करावी लागेल. त्यानुसार दिनसाचे नियोजन करा.

कर्क – आपल्या मनासारखे यश मिळवून देणारा दिवस आहे. विचार आणि प्रयत्न यांची सांगड घाला.

सिंह – निरागस आनंदाचा आज अनुभव घ्याल. प्रेमाने जग जिंकता येते याचा प्रचीती येईल.

कन्या – आज जबाबदाऱ्या पार पाडताना काळजी घ्या. आपल्याला होत असलेला मानसिक त्रास आज निघून जाईल.

तुळ – मन करा रे प्रसन्न या म्हणी प्रमाणे वागा. नम्रतेने वागा विजय आपलाच होईल.

वृश्चिक – संमिश्र घटनांचा दिवस राहील. वेळेनुरूप स्वतःमध्ये बदल घडवा. समस्यांना तोंड द्यावे लागेल.

धनू – इतरांना सल्ला, मार्गदर्शन करावे लागेल. हितचिंतकाच्या सल्ल्यांनी चांगले निर्णय घ्या.

मकर – असत्य बोलायची वेळ आली तर मौन बाळगा पण असत्य आचरण नको. वाईट विचारांचा त्याग करा.

कुंभ – मनस्वास्थ सुधारेल. दिवस सुख समाधान मिळवून देईल. ऊत्साही राहा.

मीन -सर्वांना एकत्र घेऊन आज मार्गक्रमण करा, यशाचे शिखर गाढाल.इतरांना आदराने वागवा.

सागर अशोक पडवळ
ज्योतिष आणि टॅरो कार्ड मार्गदर्शक
९९३०८७४४८५