
सीएनजी बाईक खरेदीसाठी ग्राहकांचा मोठा प्रतिसाद
स्वप्निल कदम l कुडाळ :बहुप्रतिक्षित जगातील पहिली सीएनजी बाईक लॉन्च झाली असून या बाईक चे आगमन कुडाळ येथील बजाज शोरूम मध्ये झाले आहे . सीएनजी बाईक दाखल झाल्या असून त्याचे वितरण माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते कुडाळ येथील बजाज शोरूम येथे मोठ्या दिमाखात स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने करण्यात आले.यावेळी बजाज शोरूम चे जनरल मॅनेजर निलेश कडावलकर, ऋषिकेश प्रभू. मंदार मांजरेकर, अभिषेक वारंग, राकेश परब, राजेंद्र धरणे तसेच
सीएनजी गाडी विकत घेतलेले सर्व ग्राहक तसेच शोरूम मधील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी माजी खासदार निलेश राणे यांनी ग्राहकांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.ग्राहकांनी देखील मनसोक्त गप्पा माजी खासदार निलेश राणे यांच्यासोबत मारल्या. सीएनजी गाडी मिळाल्याबाबत ग्राहकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी निलेश राणे यांनी बजाज सीएनजी बाईक चे कौतुक केले.ही बाईक पेट्रोल आणि सीएनजी या दोन्ही इंधनांवरती धावणार असून भारतातील दुचाकी कंपनी बजाजने हा चमत्कार घडवला आहे.यामुळे ग्राहकांची आर्थिक बचत होणार आहे.जास्तीत जास्त ग्राहकांनी सीएनजी बाईक चा वापर करावा असे आवाहन यावेळी श्री राणे यांनी केले दाखल झालेल्या स्टॉप मधील सर्व गाड्या आगाऊ बुकिंग झाल्या होत्या.ग्राहक आतुरतेने सीएनजी गाडीची वाट पाहत होते.ग्राहकांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसत होता.












