कोलकाता येथील घटनेचा मंडणगड तालुका डॉक्टर असोसिएनकडून निषेध तालुक्यात एक दिवसाचा बंद 

 

मंडणगड l प्रतिनिधी : आर.जी. मेडिकल कॉलेज कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ मंडणगड तालुका डॉक्टर असोसिएशन मंडणगड यांच्यावतीने 17 ऑगस्ट 2024 रोजी तालुक्यात एक दिवसाचा बंद ठेवण्यात आला. तालुक्यातील खाजगी दवाखान्यांची ओपीडी सेवा यामुळे चौवीस तासांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. ओसिएशनचे सर्व पदाधिकाऱ्यांनी निवासी नायब तहसिलदारांची भेट घेऊन या गंभीर व संवेदनशील विषयाबद्दल लेखी निवेदनही सादर केले आहे.

तहसिल कार्यालयात सादर करण्यात आलेल्या निवेदनातील माहीतीनुसार कोलकाता येथील घटना आणि डॉक्टरांवर वारंवार होणाऱ्या हल्याबद्दल संघटनेने आपले मत प्रत्येक ठिकाणी वेळोवेळी मांडले आहे. कोलकाता येथील घटना ही गँग रेप आणि हत्येचा प्रकार असून याचा जाहीर निषेध म्हणून मंडणगड तालुका डॉक्टर असोसिएशनचेवतीने 17 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी सहा ते 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 6 या चौवीस तासांचे कालावधीसाठी सर्व वैद्यकीय सेवा बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. तज्ञ डॉक्टरांचे सेवीची गरज पडल्यास आम्ही ग्रामिण रुग्णालय मंडणगड येथे आपत्तकालीन स्थिती करिता सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे. या निवेदनावर असोसिएशनचे अध्यक्ष विकास जाधव, महिला अध्यक्षा डॉ. संध्या पवार, उपाध्यक्ष डॉ. अमितकुमार गिरासे, सचिव निलेश स्वामी, खजिनदार किशोर शेठ, डॉ. आशिष जाधव, डॉ. प्रभाकर भावठाणकर, डॉ. प्रदीप मुळ्ये, डॉ. अक्षय पाटणकर, डॉ. प्रमोद मोरे, डॉ. सुशांत रहाटे, डॉ. उल्हास डंबे, डॉ.अमोल किर, डॉ.सौरभ तांबे, डॉ. तहविलदार, डॉ. पुरुषोत्तम शिंदे, डॉ. अंकिता राहाटे, डॉ.रोशनी तांबे, डॉ. दिपाली पाटणकर, डॉ. साक्षी जाधव यांच्या सह्या आहेत.