कुटरे, चिपळूण| जमिनीतून, तसेच बियाण्याद्वारे पसरणारे जीवाणूजन्य-विषाणूजन्य, बुरशीजन्य रोग व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या रोगांचे वेळीच नियंत्रण करणे गरजेचे असून, बीजप्रक्रिया अत्यंत प्रभावी साधन आहे. बियाणे बदल कमी असलेल्या पिकांमध्ये शेतकऱ्यांकडील स्वत:चे बियाणे वापराचे प्रमाण जास्त असल्यामुळे या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. बीजप्रक्रियेमुळे बियाण्यापासून प्रसारित होणाऱ्या आणि जमिनीत असणाऱ्या बुरशीच्या जिवाणूपासून संरक्षण मिळते, जमिनीत असणाऱ्या किडी व पेरणीपासून ३०-३५ दिवस रस शोषक किडी आणि खोड माशी प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो, कीड व रोग व्यवस्थापनेच्या खर्चात बचत होते, बियाण्याची उगवण क्षमता वाढवते, जैविक खताच्या प्रक्रियेमुळे जिवाणू झाडांना अन्नद्रव्य लवकर उपलब्ध करून देतात, उत्पादनात वाढ होते. अशी माहिती कृषिदूत यश मगर यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाप्रसंगी दिली.
सदर कार्यक्रमास सरपंच संजीवकुमार गुजर, उपसरपंच सुरभी जाधव, सूर्यकांत आग्रे, अमरदीप कदम, प्रतिभा साळवी, समीक्षा राजेशिर्के, बळीराम साळुंखे, प्रदीप कदम, रवींद्र जाधव, संजय राजेशिर्के, बाबुराव राजेशिर्के तसेच कृषिविश्व कृषिदूत संघातील ऋषिकेश क्षीरसागर, तुषार यादव, संग्राम पाटील, सुमित सावंत, अनिकेत मस्के, सुयश शिंदे, आदित्य शिरसाट, शुभम हराळे, अतुल निळे, नितीश वाली, संदेश डोमाळे, ओंकार फाळके उपस्थित होते.












