रुण गाव मोबाईल सेवेपासून वंचित, लोकांची होतेय गैरसोय

 

बीएसएनएल किंवा खासगी मोबाईल टॉवर उभारून गैरसोय दूर करण्याची मागणी

लांजा (प्रतिनिधी) तालुक्याच्या पश्चिम भागातील रुण गाव हे अद्यापही मोबाईल सेवेपासून वंचित आहे. मोबाईल रेंज व नेट उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत असून या ठिकाणी बीएसएनएल किंवा अन्य खासगी टॉवर उभारून ग्रामस्थांची होणारी गैरसोयी दूर करावी, अशी मागणी रूण गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव आणि ग्रामस्थ वसंत सावंत यांनी केली आहे .

 

 

देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन झाला तरी रूण गाव अद्यापही मोबाईल सेवेपासून वंचित राहिले आहे. लांजा शहरापासून १८ किलोमीटर अंतरावर डोंगरामध्ये गाव वसलेले आहे. गावची लोकसंख्या ही सुमारे पंधराशे च्या आसपास आहे. या रुण गावामध्ये रेशन दुकान, डॉक्टर, ग्रामपंचायत कार्यालय या माध्यमातून होणारी ऑनलाइनची कामे करताना असंख्य अडचणी निर्माण होत आहेत .विशेषता रेशन दुकानात धान्य देयासाठी पॉस मशिनला मोबाईल रेंजची आवश्यकता आहे. मात्र रेज उपलब्ध होत नसल्याने मोठी कसरत करावी लागत आहे .सातबारा किंवा अन्य शासकीय दाखले मिळवताना मोठी अडचण निर्माण होत आहे .

 

 

रूण गावामध्ये बीएसएनएल किंवा अन्य खासगी मोबाईल टॉवर उभारण्यात यावा अशी मागणी वारंवार करण्यात येऊन तसेच ठराव देखील ग्रामपंचायत मार्फत संबंधित कार्यालयाकडे पाठवण्यात आले होते. मात्र अद्यापही त्याबाबत कोणतीच कारवाई करण्यात आलेली नसल्याने रूण गाव हे मोबाईल रेंज पासून वंचित राहत आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे .
दरम्यान, या ठिकाणी एकतर बीएसएनएल टॉवर किंवा किंवा अन्य खासगी टॉवर उभारून ग्रामस्थांची होणारी गेल्या कित्येक वर्षाची मागणी पूर्णत्वास न्यावी, अशी मागणी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य महेश जाधव आणि ग्रामस्थ वसंत सावंत यांनी केली आहे.