सावंतवाडी : हाँगकाँग येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटरनॅशनल एरिथमॅटिक्स अँड मॅथ्स असोसिएशन (आय ए एम ए ) तर्फे घेण्यात आलेल्या अबॅकस स्पर्धेत एडु स्मार्ट इंक सावंतवाडी (स्मार्ट किड्स अबॅकस सेंटर)च्या चिराग राजेश चितारी या विद्यार्थ्याने चौथा क्रमांक पटकावला आहे.
ही स्पर्धा हॉंगकॉंग येथे ४ ऑगस्टला घेण्यात आली होती या स्पर्धेत विविध देशातील 2000 मुले सहभागी झाली होती चिरागच्या या यशाने सिंधुदुर्ग जिल्ह्याची तसेच सावंतवाडीची मान उंचावली आहे चिरागने ॲबॅकसचे प्रशिक्षण भटवाडी सावंतवाडी येथे स्मार्ट किड्स ऍक्टिव्हिटी सेंटरच्या संचालिका सौ सपना पिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले आहे. चिरागच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.











