जगबुडी नदी पूलावरील ती मार्गिका अखेर खुली

खेड(प्रतिनिधी) मुंबई – गोवा महामार्गावरील भरणे येथील नव्या जगबुडी पुलावरील एका मार्गिकेच्या मध्यभागी उखडलेल्या पुलाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. होते मात्र महिना लोटून देखील मार्गिका खुली झाली नव्हती मात्र बुधवारी ही मार्गिका खुली झाल्याने यावरून वाहने धावू लागली आहेत
१३ जुलै रोजी भरणे येथील नव्या जगबुडी पुलावरील मध्य भाग उखडल्याचे निदर्शनास येत पोलीस यंत्रणेने तातडीने पुलावरील एका मार्गिकेची वाहतूक बंद केली होती राष्ट्रीय महामार्ग खात्याने  उखडलेल्या मध्यभागाची करत दुरुस्तीचे काम हाती घेऊन त्यावर रॅपिड हार्ड सिमेंट चा वापर करून ती दुरुस्ती करण्यात आली होती मात्र महिन्या चा कालावधी लोटून देखील मार्गिका खुली न करण्यात आल्याने वाहने एकाच मार्गिके कडून धावत होती अखेर बुधवार पासून ही मार्गिका खुली झाली आहे त्या मुळे वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे