रत्नागिरी : अध्यात्मिक कार्य व सामाजिक बांधिलकी असणाऱ्या मंडळाचा कार्यकारिणीचा ५ वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवड जाहिर करण्यात आली. या निवड प्रक्रियेमध्ये वाडीतील बहुसंख्य ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते. नियोजित कार्यक्रमामध्ये मंडळाचे विद्यमान अध्यक्ष विलास (बापू) डांगे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
उपाध्यक्षपदी संजय डांगे, सचिव सौ. मयुरी डांगे, सहसचिव प्रथमेश डांगे व खजिनदार सार्थक डांगे व सौ. समिता डांगे यांचीही बिनविरोध निवड झाली. या वेळी मंडळाचे मावळते अध्यक्ष सुनिल डांगे हे परशुरामपंत अभ्यंकर प्राथमिक विद्यामंदिरातून लिपीक म्हणून सेवानिवृत्त झाल्याबद्दल मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक अर्जुन डांगे यांनी सत्कार केला. कार्यक्रमाला हातखंबा गावचे उपसरपंच सुनिल डांगे व मंडळाचे सल्लागार प्रकाश डांगे उपस्थित होते. सुनिल डांगे यांनी मनोगतामध्ये नवनिर्वाचित कार्यकारिणीला भरभरून शुभेच्छा दिल्या व उत्तम कामाची ग्वाही दिली. अध्यक्ष विलास डांगे यांनी या यशस्वी व नावाजलेल्या मंडळाची धुरा समर्थपणे पुढे नेण्याचे माझ्याकडून प्रयत्न होतील, असे सांगितले. सहसचिव प्रथमेश डांगे यांनी सूत्रसंचालन केले.










