लांजा ( प्रतिनिधी) लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पदी निळकंठ गोपाळकृष्ण बगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी १८ ऑगस्ट रोजी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
यापूर्वी निळकंठ बगळे हे रत्नागिरी येथे आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते. तर त्या अगोदर त्यानी काही वर्षापुर्वी राजापूर पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरिक्षक म्हणुन काम केलेले आहे . जिल्ह्यातील पोलीस निरीक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. लांजाचे या आधीचे पोलीस निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांची पालघर जिल्ह्यात बदली झाली असून त्यांच्या जागी निळकंठ बगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, नवनियुक्त पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांचे लांजा तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी भेट घेऊन स्वागत केले.











