पालु नामेगाव येथे १३ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय भव्य चिखल नांगरणी स्पर्धा

 

लांजा (प्रतिनिधी) तालुक्यातील पालु नामेगाव येथे १३ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय भव्य चिखल नांगरणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
नामेगाव ग्रामस्थांच्या वतीने या राज्यस्तरीय
भव्य चिखल नांगरणी स्पर्धा टीटवली झाडये माळ मैदान या ठिकाणी होणार आहे. स्पर्धेत बाजारी गट:-
प्रथम: विजेत्यांना रोख रूपये १०,००० ढाल असे बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. द्वितीय विजेत्याला रुपये :-७००१ व ढाल, तृतीय क्रमांकाला रुपये:-५,००१ व ढाल, चतुर्थ:- २००० व ढाल आणि
पाचव्या विजेत्याला रुपये १५०० व ढाल अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. यासाठी ५०० रुपये प्रवेश शुल्क आकारले जाणार आहे. गावठी गटातील प्रथम क्रमांकाला रूपये ७,००१ व ढाल, द्वितीय विजेत्याला
५,००१ व ढाल, तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना ३,००१ व ढाल, चौथ्या क्रमांकाला रुपये १५०० व‌ ढाल आणि पाचव्या विजेत्याला रुपये १००० व ढाल अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. या गटासाठी ४०० रुपये प्रवेश फी आकारली जाणार आहे.

 

 

तसेच गाव पातळीवर प्रथम विजेत्याला रोख रक्कम व ढाल, द्वितीय क्रमांक: -रोख रक्कम व ढाल, तृतीय क्रमांक: रोख रक्कम व ढाल अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा – सचिन पोकडे :-७०२८३६४१९६
अमोल झोरे:-९२७३१८२२७३
मुकेश नामे-८९९९६२२१२३
अभिजित नामे-९३२२००३९४२

_______