अखेर ठरले… 31 ऑगस्ट पासून “चिपी-सिंधुदुर्ग पुणे विमानसेवेला होणार शुभारंभ

फ्लाय 91 कंपनीने आपल्या अधिकृत साईट वरुन दिली माहिती..

परुळे : प्रतिनिधी
अखेर ठरले… 31 ऑगस्ट 2024 पासून म्हणजेच गणेश चतुर्थी पूर्वी सिंधुदुर्ग पुणे विमानसेवेला शुभारंभ होणारआहे. आठवड्यातून दोन वेळा विमान फेरी असेल. शनिवारी सकाळी पुणे वरुन 8.05 ला विमान सुटून 9.10 वाजता सिंधुदुर्ग ला पोहोचेल सिंधुदुर्ग वरुण 9.30 ला सुटून 10.35 ला पुणे येथे पोहोचेल. विमान सेवा देणाऱ्या फ्लाय 91 कंपनीने आपल्या अधिकृत साईट वरुण प्रवाशांना ही माहिती दिली आहे.

चिपी-सिंधुदूर्ग पुणे या रूट साठी अखेर विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली असून गणेश चतुर्थी पूर्वी ही विहेमानसेवा Fly 91 कंपनी तर्फे सुरु करण्यात येत आहे. सद्या प्रत्येक शनिवार रविवारी चिपी-पुणे -चिपी अशी प्रवासी विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. याबाबत पुणे विमानतळ येथे स्लॉट उपलब्ध करून मिळणे साठी अडचण येत होती. याबाबत खासदार श्री नारायण राणे यांनी हवाई मंत्री आणि संरक्षण मंत्री यांना पत्र पाठवून लक्ष वेधले होते. या नंतर दोन दिवसा साठी विमान सेवा सुरु करणे चे आदेश देणेत आले. दरम्यान माजी सभापती निलेश सामंत यांनी मा.राणे साहेबांची भेट घेऊन सदर विमान सेवा संपूर्ण आठवडा भर सुरु करण्या साठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे