संगमेश्वर तालुक्यातील साखरपा ग्रामपंचायतीच्या रिक्त असणाऱ्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत साखरपा गुरववाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शशांक लिंगायत यांची बिनविरोध निवड झाली.
त्यांच्या निवडीने गावातील शिवसेना उबाठा गटाने आनंद साजरा केला. मागील 30 वर्षांपेक्षा जास्त काळापासून या ग्रामपंचायतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे वर्चस्व आहे.
या निवडीनंतर माजी पंचायत समिती सदस्य व लांजा राजापूर विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने यांनी शशांक यांना शुभेच्छा दिल्या.त्यावेळी त्यांच्यासमवेत गावच्या सरपंच रुचिता जाधव,रामभाऊ गोवरे,माजी सरपंच विजय पाटोळे,ग्रा. प. सदस्य गजानन(बाब्या)पवार,सुमित वाघधरे,सौ.साळसकर, सौ. सुर्वे,सौ. कुरूप,श्रद्धा सकपाळ,राजा लिंगायत,दीपक गोवरे,धनंजय लोटणकर, सनित गांधी, आदी शिवसैनिक, ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांनी शशांक यांना उत्तम कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी शशांक लिंगायत यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. शशांक हे गुरववाडी मधील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. वाडीतील नागरिकांसाठी कायम मेहनत घेतात. आपल्याला मिळालेल्या पदाचा वापर करून गावच्या विकासासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे सांगितले.











