खेड (प्रतिनिधी) येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय.सी.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या साहिल सोंडकर या विद्यार्थ्यांची दिल्ली येथे होणाऱ्या ऑल इंडिया थल सैनिक कॅम्प २०२४ साठी निवड झाली आहे.
साहिल हा एस.वाय.आय.टी. मध्ये शिकत आहे. या निवडीसाठी त्याला ७ विविध चाचण्यांमधून जावे लागले, त्यानंतर त्याची ही निवड करण्यात आली.
हा कॅम्प कोणत्याही छात्रासाठी सर्वात कठीण मानला जातो आणि अशा कॅम्प मध्ये निवड होणे ही एक फार मोठी संधी मानली जाते. ऑब्स्ट्रॅकल ट्रेनिंग, फायरिंग, मॅप रीडिंग यासारख्या गोष्टी तेथे शिकवल्या जातात व एकूणच व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला जातो. या कॅम्पमध्ये आर्मी विषयक विविध प्रकारची माहिती दिली जाते.
ही निवड होण्यासाठी महाविद्यालयाचे माजी एन.सी.सी. विभाग प्रमुख डॉ.एच.पी. थोरात तसेच केअरटेकर डॉ.सचिन सागर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. साहिल सोंडकर याची या कॅम्प साठी निवड झाल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.












