देवगड तालुक्यातील वीज ग्राहकांच्या समस्या व तक्रारी जाणून घेण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत वीज ग्राहकांच्या बैठकीचे आयोजन देवगड येथे करण्यात आले आहे
ही बैठक देवगड सातपायरी येथील इंद्रप्रस्थ हॉलमध्ये 30 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित राहून ग्राहकांच्या समस्येची व तक्रारींची दखल घेणार आहेत. या समस्या स्वतः आमदार नितेश राणे उपस्थित राहून ऐकून घेणार आहेत व त्यावर मार्ग काढणार आहेत.या बैठकीला वीज ग्राहकाने आपल्या तक्रारी व समस्या घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.












