*माखजन |वार्ताहर : क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय रत्नागिरी आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे.
17 वर्षे वयोगटांमध्ये सुतेज बेर्डे – व्दितीय साईराज गुढेकर – पाचवा या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवून यांची निवड विभागीयस्पर्धेसाठी झालेले आहे यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे क्रीडा शिक्षक श्री समीर कालेकर सर यांचे मार्गदर्शन लाभले .व्यवस्थापक म्हणून सौ. गायत्री सोळुंखे यांनी काम पाहिले यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ . स्वप्नाली पाटील उपमुख्याध्यापक श्री . संजय बनसोडे पर्यवेक्षक श्री . संदीप मुंढेकर तसेच परशुराम एज्युकेशन सोसायटीचे सर्व संचालक मंडळ यांनी शुभेच्छा दिल्या व कौतुक केले .











