खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील तिसंगी ग्रामपंचायतीच्यावतीने इयत्ता १० वी, १२वी व अन्य गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सरपंच मनिषा काजारे यांच्या
अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.
याप्रसंगी उपसरपंच स्नेहल भोसले, ग्रामसेवक ज्ञानेश्वर राख, पोलीस पाटील संतोष मोहिते, स्वाती भोसले, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भोसले, संतोष उर्फ पप्या आखाडे, अशोक गमरे, लिला यादव, संजीवनी पिंपळकर, नंदकिशोर भोसले, अनंत भोसले, शामसुन्दर कदम, मोहन भोसले, संदीप फाळके, शंकर भोसले, शैलेश उर्फ धाकु भोसले, विजय भोसले आदी उपस्थित होते. अंजली जंगम हिने आभार मानले.









