गुहागर नगरपंचायतीत भाजपने आपले खाते उघडले

युतीच्या माध्यमातून प्रभाग क्र.5 मधून भाजपच्या वैशाली मावळणकर बिनविरोध
मनसेच्या सिद्धी राजेश शेटे यांची माघार
गुहागर :
गुहागर नगरपंचायत निवडणूकिसाठी शुक्रवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रभाग क्रमांक 5 मधून मनसेच्या सिद्धी राजेश शेटे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने येथील प्रभाग क्र. 5 मध्ये एकच उमेदवार राहिल्याने युतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या वैशाली संतोष मावळणकर या बिनविरोध विजयी झाल्या आहेत.याबाबत अधिकृत माहिती मुख्याधिकारी स्वप्निल चव्हाण यांनी दिली.
सध्या येथील नगरपंचायत निवडणुकीत भाजप व शिवसेना युती असल्याने भाजपाचा पर्यायाने युतीचा पहिला नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने प्रत्यक्ष मतदानापूर्वीच युतीचा उमेदवार निवडून आला आहे यामुळे येथील युतीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.