रत्नागिरी । प्रतिनिधी
शहरातील मुरुगवाडा येथे विहिरीत पडून 13 वर्षीय मतिमंद मुलाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार 12 जुलै रोजी सकाळी 11.30 वा.सुमारास उघडकीस आली.
आसिफ लतिफ शेख (13,रा.मुरुगवाडा,रत्नागिरी) असे विहिरीत बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. आतिफ हा मतिमंद आणि लंगडत चालायचा त्यामुळे त्याचे नातेवाईक त्याला घराबाहेर एकटे सोडायचे नाहीत. शुक्रवारी सकाळी आतिफ घरात कोठेही दिसून न आल्याने त्याचे आजी-आजोबा त्याचा आजुबाजुला शोध घेत असताना घरा शेजारच्या विहिरीत तो बुडलेल्या अवस्थेत त्यांना दिसून आला. त्यांनी त्याला विहिरीतून बाहेर काढून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी आतिफला तपासून मृत घोषित केले. याबाबत शहर पोलिस ठाण्यात दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.













