रत्नागिरी : जी एम् शेट्ये हायस्कूल बसणी येथे दि. ०८/०९/२०२४ रोजी माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष अविनाश शेट्ये यांनी सांगितले.
स्वातंत्र्यानंतर अवघ्या सात आठ वर्षांत बसणी पंचक्रोशी शिक्षण संस्थेची स्थापना ०७जुलै१९५५ रोजी कै.. गणपत महादेव शेट्ये यांनी केली . गेली ६९ वर्ष ज्ञानदानाचे कार्य केलेल्या या संस्थेचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. संस्थेचे अध्यक्ष अॅड अविनाश शेट्ये यांच्या संकल्पनेतून आपली शाळा आपला सहभाग अभियान संस्थेने सुरू केला आहे त्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाअंतर्गत आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी सर्व आजी माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व हितचिंतक यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष यांनी केले आहे.










