महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी सिंधुदुर्गचे सुपुत्र ॲड.संग्राम देसाई यांची निवड

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ही निवड भूषणावह

सिंधुनगरी : बाळ खडपकर

बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा चे अध्यक्ष पदासाठी सिंधुदुर्ग चे सुपुत्र व प्रसिद्ध वकील ॲड. संग्राम देसाई यांची बुधवारी निवड झाली. दोन राज्यांच्या या बार कौन्सिलवर अध्यक्ष पद स्वीकारणे हे या जिल्ह्यासाठी भूषणावह असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वकील, न्यायालयीन कर्मचारी अधिकारी, नागरिकांनी व संग्राम प्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.

जिल्हा न्यायालयात तसेच उच्च न्यायालयात वकिली सेवेची एक चांगली छाप ॲड. संग्राम देसाई यांनी उमटवली आहे. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या सन 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी प्रथम सदस्य पदी व नंतर उपाध्यक्षपदी विजय मिळविला होता. गेली पंचवीस वर्षे वकिली सेवा सुरू असून अनेक न्यायदानाच्या कामात त्यांचे मोठे योगदान आहे.

न्याय प्रक्रियेतील ई-फायलिंग, कुडाळ व देवगड या दोन न्यायालयांच्या इमारतीच्या कामात ॲड. संग्राम देसाई यांचे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील वकील वर्गात त्यांना आदराचे स्थान असून नवोदित वकिलांसाठी त्यांनी विशेष मार्गदर्शन शिबिरे व प्रशिक्षणाचे उपक्रम, न्यायदानाविषयी माहिती पुस्तिका हेही चांगले काम केले आहे. अत्यंत नम्र, शिस्तप्रिय व न्यायदानाच्या बाबतीत प्रामाणिक वकिली सेवा असा त्यांचा परिचय असून त्यांच्या या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला