कुटुंबीयांसह सर्व स्तरातून होत आहे कौतुक
वेंगुर्ले : दाजी नाईक : पुणे, पिंपरी चिंचवड येथे पार पडलेल्या ‘महाराष्ट्राची सौदर्यवती २०२४’ स्पर्धेमध्ये वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा वेळागरवाडी येथील कु. मालिनी मदन अमरे ही युवती उपविजेती ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्राची महासौदर्य स्पर्धा मेगा फायनल पुणे येथे संपन्न झाली. श्री. संजीव जोग कॅलिस्टॉ पेजेन्ट यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. राज्यभरामधून 26 स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. उत्तरोत्तर रंगतदार ठरलेल्या या स्पर्धेत मा
लिनी मदन अमरे हिला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तिचे कुटुंबीयांकडून व समाजातून अभिनंदन होत आहे.












