महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय परफॉर्मिंग आर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये दबदबा; नऊ सुवर्णपदकांसह लक्षिता आणि सादाब ठरले राष्ट्रीय चॅम्पियन

 

आयोध्या, उत्तर प्रदेश: दोन दिवसीय राष्ट्रीय परफॉर्मिंग आर्ट्स चॅम्पियनशिप 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर रोजी आयोध्या, उत्तर प्रदेश येथे संपन्न झाली. या स्पर्धेत उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, गोवा, झारखंड, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, तामिळनाडू आणि महाराष्ट्र यांसारख्या विविध राज्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी नऊ सुवर्णपदकांची कमाई करत राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे विजेतेपद मिळवले. महाराष्ट्रातील लक्षिता दुबे आणि सादाब सरकार यांनी त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने “बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द डे” चे किताब जिंकत राष्ट्रीय चॅम्पियन ठरले.

*विजेते विद्यार्थ्यांची कामगिरी:*

– *८ वर्षांखालील वयोगटात:*
– वेस्टर्न प्रकारात: रत्नागिरी जिल्ह्यातील द्विज हेमंत जाधव – सुवर्णपदक
– वेस्टर्न प्रकारात: गार्गी राजेश सुपे – रोप्य पदक
– फोक प्रकारात: सातारा जिल्ह्यातील अभिज्ञा गोडसे – कास्यपदक

– *८-११ वयोगटात:*
– वेस्टर्न प्रकारात: मुंबईच्या सादाब सरकार – सुवर्णपदक
– कंटेम्परी प्रकारात: त्रिशा मेंढेकर – रोप्य पदक
– फोक प्रकारात: आराध्या सवाई – सुवर्णपदक, आदिती पावणे – कास्यपदक

– *११-१४ वयोगटात:*
– फोक प्रकारात: नागपूरच्या इशिता वाटकर – सुवर्णपदक
– फोक प्रकारात: राशी पारधी – रोप्य पदक
– वेस्टर्न डुएट प्रकारात: राधे रमण तिवारी आणि जितेश चिखलिया – रोप्य पदक

– *१४ वर्षे वयोगटात:*
– क्लासिकल प्रकारात: पालघरच्या सृष्टी जेना – सुवर्णपदक

– *१४ वर्षे वरील वयोगटात:*
– वेस्टर्न प्रकारात: नालासोपाराच्या लक्षिता दुबे – सुवर्णपदक

– *१७ वर्षे वरील वयोगटात:*
– फोक प्रकारात: नागपूरच्या अलिशा हेदाऊ – सुवर्णपदक

*राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे विशेष गुणांक:*
लक्षिता दुबे आणि सादाब सरकार यांनी त्यांच्या वयोगटांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत “बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द डे” चे किताब जिंकले. विजेत्यांना उत्तर प्रदेशातील मॅजेस्टिक ऑफिसर राजेश मिश्रा यांच्या हस्ते सुवर्ण व रोप्य पदके प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय सचिव श्री. रजनीकांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. वर्ल्ड हिप हॉप आयकॉन आणि “वि कंपनी”चे संचालक श्री. वर्णन मोंटीरियो हेही मान्यवर म्हणून उपस्थित होते.

*महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय संघाचे मॅनेजर श्री. सुरज विलास जाधव यांचे मार्गदर्शन:*
महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय संघाचे मॅनेजर श्री. सुरज विलास जाधव यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देत पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. हे सर्व विद्यार्थी नोव्हेंबरमध्ये काठमांडू, नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत.

महाराष्ट्राच्या या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने राज्याचा गौरव वाढवला आहे.