भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित
वैभववाडी l प्रतिनिधी : आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून गणपती स्पेशल मोदी एक्सप्रेस बुधवारी रात्री 12 वाजता वैभववाडी रेल्वे स्थानकावर दाखल झाली. रेल्वेतील उतरलेल्या चाकरमानी प्रवाशांचे वैभववाडी भाजप तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे आणि सरचिटणीस संजय सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व उपस्थित सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रवाशांनी आमदार नितेश राणे यांनी प्रवासासाठी रेल्वे सोडल्यामुळे सुलभ प्रवास झाला. त्यामुळे आमदार नितेश राणे यांचे सर्व प्रवाशांनी आभार मानले. यावेळी पुंडलिक पाटील, अनिकेत सावंत उपस्थित होते.












