सुनिल तांबे यांची महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्षपदी सलग अकराव्या वर्षी निवड 

 

मंडणगड l प्रतिनिधी : महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीचे सोवली चे अध्यक्षपदी सामाजीक कार्यकर्ते सुनिल तांबे यांची सलग अकराव्या व्या वर्षी बिनविरोध निवड झाली. आंबेडकरी चळवळीतील झुंजार नेर्तुत्व असलेल्या श्री. सुनिल तांबे यांनी आपल्या वाडीला पाणी मिळावे या साठी अहो रात्र लढा देऊन पाणी आपल्या वाडीत आणले.

 

 

सोवेली ग्रामपंचायतीच्या सत्ताकारणातही त्यांना महत्वाचे स्थान आहे. ग्रामपंचायत मधील प्रत्येक तंटा आपल्या गावातच सामोपचाराने कसा मिटेल यावर भर दिल्याने सुनिल तांबे यांची सलग अकराव्या वर्षी ग्रुप ग्रामपंचायत सोवेलीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.