माखजन परिसरात भात पसवायला सुरवात

 

 

*माखजन |वार्ताहर*       दरवर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान कोकणात भातशेती पसवायला सुरवात होते.ऊन पावसाच्या खेळात, शेतात डोलनारे पीक पीक मनोहारी दिसत.

यावर्षीही गणेशा च्या आगमनासोबतच शेता शेतात भात पीक डोलायला सुरवात झाली आहे.लोंबिला आलेले दाणे पाहता,यावर्षी भातपीक चांगले आले असल्याचे चित्र आहे.हळवी भात शेती काही ठिकाणी ,अल्पवधीतच कापणीला येईल अशी चिन्हे आहेत.सध्या कमी असलेला पाऊस भातशेती ला पोषक असल्याने,भरगोस पीक येत असल्याने शेतकरी समाधानी दिसंत आहे