सावंतवाडी । प्रातिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथील अक्षय साईल या युवकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या ११ फरार संशयितांपैकी तिघांना सावंतवाडी पोलिसांनी अटक केली. अजित बाळकृष्ण मठकर , संकेत रत्नाकर माळी ( दोघेही रा . सावंतवाडी ) व शरद राजन उर्फ श्यामू साळगावकर ( रा . माजगाव , सावंतवाडी ) अशी या संशयितांची नावे आहेत. या तिघांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. वेदिका राऊळ यांनी काम पाहिले.
दरम्यान, या प्रकरणातील ८ संशयित अद्यापी फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत अशी माहिती सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली.











