मसुरे | झुंजार पेडणेकर : पावणाई देवी महिला दुग्ध उत्पादक संस्था मसुरे यांच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच लिटर तेल कॅनचे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाटप करण्यात आले. संस्था अध्यक्ष सौ. अलका विश्वास साठे, सौ. पूजा ठाकूर, व महिला संचालक सदस्य उपस्थित होते. एकूण 82 शेतकऱ्यांना हे वाटप करण्यात आले. गेली पाच वर्ष संस्थेच्या वतीने उत्सवा निमित्त सदर गृह उपयोगी साहित्य वाटप करण्यात येते असे यावेळी डॉ. विश्वास साठे म्हणाले. यावेळी रमेश पाताडे, सचिन गोलतकर, सुरेश मापारी, सिद्धेश मसूरकर, महंमद खान, सोहेल फकीर, तुळशीदास चव्हाण, सुमित सावंत,आबा आईर, गणेश परब, किरण पवार, संदेश पवार, संतोष राणे, मुबारक मिर, धनंजय बागवे, हेमंत बागवे, सूरज परब, विकास ठाकूर आदी शेतकरी उपस्थित होते.









