राजापूर (वार्ताहर): सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे नेते किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत राजापूर तालुक्यातील धारतळे एस टी पिक अप शेडचे उद्घाटन करण्यात आले.
तसेच धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या वाढीव बांधकामाचे उद्घाटन देखील यावेळी संपन्न झाले. या कार्यक्रमावेळी शिवसेना तालुका प्रमुख दिपक नागले, नाटे विभाग प्रमुख मनोज आडविलकर, देवाचे गोठणे उपविभाग प्रमुख विनोद शेलार,आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.












