स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) टप्पा-2 अंतर्गत स्वच्छता ही सेवा 2024 अंतर्गत जिल्हास्तरीय स्वच्छ सुंदर शाळा स्पर्धा

 

 

स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 02 ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस (SBD) म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने स्वच्छता हि सेवा (SHS) मोहिम दि.14 सप्टेंबर 2024 ते 02 ऑक्टोबर 2024 या कालावधीत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये राबविण्यात येत आहे. या वर्षीच्या स्वच्छता ही सेवा 2024 साठी “स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता” ही थीम केंद्र शासनाने निश्चित केली आहे. त्यानुसार स्वच्छता की भागीदारी अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांकरिता “स्वच्छ सुंदर शाळा” या जिल्हा स्तरीय स्पर्धेचे आपल्यामार्फत नियोजन करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धेसाठी खालील मुद्द्यांच्या आधारे स्पर्धेचे नियोजन करण्यात येणार आहे.

स्वच्छ सुंदर शाळा निवडीचे निकष-

1) शौचालय व्यवस्थापन- मुलींसाठी व मुलांसाठी वेगवेगळे असणे आवश्यक, अपंग मुलांसाठी व्यवस्था

2) हात धुण्यासाठी व्यवस्था आवश्यक

3) घनकचरा व्यवस्थापन – ओला कचरा व सुका कचरा व्यवस्थापन असणे आवश्यक.

4) सांडपाणी व्यवस्थापन असणे आवश्यक.

5) पाऊस पाणी संकलन

6) परिसर स्वच्छता

7) किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन कार्यवाही असणे आवश्यक.

8) शालेय भिंतींवर स्वच्छता विषयक संदेश असणे आवश्यक.

9) पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणे आवश्यक.

10) टाकाऊ वस्तुंपासून टिकाऊ वस्तू विद्यार्थ्यांमार्फत तयार करणे आवश्यक.

11) स्वच्छतेच्या अनुषंगाने शाळेने राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रम.

उपरोक्त निकषांच्या आधारे गुणांकन करून प्रत्येक तालुक्यातील एक उत्कृष्ट शाळेची निवड करण्यात येणार आहे. व त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करून त्यामध्ये एक ते तीन जिल्हास्तरीय क्रमांक काढण्यात येणार आहेत.

➢ तालुकास्तरीय तपासणी समिती-

1) गट शिक्षणाधिकारी

2) उप अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग

3) विस्तार अधिकारी, शिक्षण.

➢ जिल्हास्तरीय तपासणी समिती-

1) मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी

2) शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जिल्हा परिषद रत्नागिरी

3) शिक्षणाधिकारी, माध्यमिक, जिल्हा परिषद रत्नागिरी

4) कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद रत्नागिरी.

➢ पारितोषिक-

जिल्हास्तरीय पारितोषिक

प्रथम क्रमांक

र.रु.15,000/- व प्रमाणपत्र

व्दितीय क्रमांक

र.रु.10,000/- व प्रमाणपत्र

तृतीय क्रमांक

र.रु.5,000/- व प्रमाणपत्र

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांनी “स्वच्छ सुंदर शाळा” या स्पर्धेमध्ये भाग घेवून स्वच्छता ही सेवा 2024 अभियान यशस्वी करावे असे आवाहन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी केले आहे.