माजी केंद्रीयमंत्री, खासदार नारायण राणे यांचे लांजा शहरात जोरदार स्वागत

 

 

लांजा (प्रतिनिधी): माजी केंद्रीयमंत्री, खासदार नारायण राणे यांचे रविवारी लांजा शहरात भाजपा कार्यालयासमोर लांजा तालुका भाजपाचे वतीने स्वागत करण्यात आले.

खासदार राणे हे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. सिंधुदुर्गकडून चिपळूणकडे रवाना होताना लांजात त्यांचे भाजपाचे वतीने तालुका अध्यक्ष चंद्रकांत मांडवकर यांनी पुष्पगुच्छ देवून खासदार राणे यांचे स्वागत केले. जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी देखील स्वागत केले. यावेळी श्री. राणे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी मनमोकळा संवाद साधला.

यावेळी तालुकाध्यक्ष चंद्रकांत मांडवकर, शहराध्यक्ष गुरुप्रसाद तेली, तालुका सरचिटणीस शैलेश खामकर, नगरसेवक मंगेश लांजेकर, नगरसेवक संजय यादव, जेष्ठ पदाधिकारी विजय कुरूप, वाघोजी खानविलकर अशोक पाटोळे, अनिल पन्हळेकर, परेश नामें, शेखर सावंत आदींसह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.